Advertisement

मेट्रो ३ मार्गावरील सीप्झ परिसरात असलेल्या खड्ड्यात शॉर्ट सर्किट


मेट्रो ३ मार्गावरील सीप्झ परिसरात असलेल्या खड्ड्यात शॉर्ट सर्किट
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ भुयारी मेट्रो प्रकल्प ३ च्या सीप्झ परिसरात असलेल्या खड्ड्यात आग लागली आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

मेट्रो-३ मार्गिकेच्या सीप्झ स्थानकावर गुरुवारी दुपारी १.४० वाजताच्या सुमारास ट्रॅफिक डेकिंग खाली असलेल्या १२ विद्युत वाहिन्यांना आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले. ही आग तातडी नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.

मे. अदानी आणि मे. टाटा यांनी बाधित क्षेत्रातील वीज पुरवठा पर्यायी स्रोताद्वारे पूर्ववत केलेला आहे. डेकिंगवरील रहदारी देखील पूर्ववत झालेली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा