Advertisement

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा


जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा
SHARES

मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रिलायन्स एनर्जीजवळ मेट्रोचं काम सुरु असणाऱ्या बांधकामाला ट्रकची धडक बसल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

ट्रकच्या धडकेमुळं वाहतुककोंडी झाली असून, पवईहून जोगेश्वरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जोगेश्वरीहून पवईकडे येणारी बाजू वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आली आहे. 

पर्यायी वाहतूक विरुद्ध दिशेनं वळवल्यानं पवईहून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या एल अँड टी फ्लायओव्हरपर्यंत रांगा लागल्यात. दुसरीकडे सारीपूतनगरपर्यंत वाहतूक खोळंबली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा