हायवेवर अनधिकृत पार्किंग

 Kandivali
हायवेवर अनधिकृत पार्किंग
हायवेवर अनधिकृत पार्किंग
See all

कांदिवली- ठाकूर कॉम्प्लेक्स वेस्टर्न हायवेवर गेल्या अनेक दिवसांपासून खाजगी बसेस अनधिकृतरित्या पार्किंग केल्या जात आहेत. रात्री बऱ्याच ठिकाणी ही अनधिकृत पार्किंग सुरु असते. अगोदरच हायवेवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि त्यात अनधिकृत पार्किंग यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. ठाकूर कॉम्प्लेक्स पुलाखालीच वाहतूक पोलीस चौकी आहे तरीही अनधिकृत पार्किंग केली जाते असे विभागातील नागरिक अरुंधती नाईक यांनी सांगितले. स्थानिक वाहतूक अधिकाऱ्यांनां विचारले असता आम्ही लगेच कारवाई करतो असे आश्वासन देण्यात आले आहे.

Loading Comments