Advertisement

राज्यातील मध उत्पादनावर संकट

महाबळेश्वरपासून 8 किलोमीटरवर देशातील पहिले मधाचे गाव ‘मांघर’ आहे. मात्र या गावामधील मधमाश्या सध्या संकटात आहेत

राज्यातील मध उत्पादनावर संकट
SHARES

महाबळेश्वरपासून (mahabaleshwar) 8 किलोमीटरवर देशातील पहिले मधाचे गाव ‘मांघर’ आहे. मात्र या गावामधील मधमाश्यांवर (honey bee) सध्या संकट ओढवले आहे. मधमाश्याच्या पोळ्याला अमेरिकन ‘फ्राऊलब्रुड’ (american froulbrud) रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

या रोगाचा फटका मध उत्पादनाला झाला आहे. मांघरमधून वर्षाला पंधरा हजार किलो मध देशातील विविध बाजारपेठेत पाठवला जातो. मात्र फ्राऊलब्रुड रोगामुळे या उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली आहे.

महाबळेश्वरच्या मांघर गावातील 80 टक्के ग्रामस्थ मधाचे उत्पादन गेली 50 वर्षे घेत आहेत. तीन रुपयांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता 700 ते 800 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.

राज्य (maharashtra) खादी व ग्रामोद्योग मंडळाने मे 2022 मध्ये या गावाला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित केले. येथील ग्रामस्थांना शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलनाचे धडे दिले गेले आहेत.

महाबळेश्वर परिसरातील वनसंपदा, शेतपिके, तेलबियाणे, रानफुले यामुळे या भागात मधमाश्यांचे प्रमाण जास्त आहे. ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी उत्पन्न स्रोतासाठी ग्रामोद्योग मंडळाने मधपेट्या दिलेल्या आहेत.  या मधपेटीने मध संकलन प्रकिया सोपी झाली आहे. जंगलातील एक राणी माशी ओळखून ती या मधपेटीत बंदिस्त केल्यानंतर इतर मधमाश्या आपोआप जमा होतात.

मध संकलनाची ही पद्धत प्रभावी ठरली आहे. मधपेट्या जमा करुन मध संकलन केल्यानंतर बाजारात पाठवले जात आहेत.

पावसाळा सरल्यानंतर यंदा मधमाश्यांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगाने (disease) घेरले आहे. या रोगामुळे मधमाश्या पोळ्यातच मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे फ्राऊलब्रुडने मध संकलित होण्याला बाधा येऊ लागली आहे, अशी माहिती मांघरचे सरपंच गणेश जाधव यांनी दिली.

फ्राऊलब्रुड या संकटाबरोबर पावसाला विलंब झाल्याने जंगलातील फुलांना तसेच वनस्पतींना जिथून मधमाश्या मध संकलित करताता त्याला फटका बसला आहे. दर सात वर्षांनी येणाऱ्या कारवीच्या फुलझाडामुळे मधमाश्यांना मिळणाऱ्या मधामध्ये अडथळा आला आहे.

फुले आल्यानंतरही पावसाचे आगमन झाले. त्याचा फटका मध उत्पन्नाला बसला असल्याचे विठ्ठल जाधव या शेतकऱ्याने सांगितले.



हेही वाचा

मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये लवकरच डस्टबिन बसवले जाणार

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 2025 मध्ये सुरू होणार यकृत प्रत्यारोपण प्रोग्राम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा