Advertisement

मैलाच्या दगडाच्या जतनात वीजेच्या खांबाचा अडथळा


मैलाच्या दगडाच्या जतनात वीजेच्या खांबाचा अडथळा
SHARES

मुंबई महपालिकेच्या अनधिकृत बांधकामाच्या धडक कारवाईत परळ येथील केईएम रुग्णालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या एस. ए. राव मार्गावर ब्रिटिशकालीन मैलाचा दगड आढळून आला आहे. या पुरातन दगडाचे जतन महापालिका करणार आहे. मात्र, या दगडाचे जतन करण्यासाठी या भागाच्या सुशोभिकरणात पदपथावरील वीजेच्या खांबाचा अडथळा येत आहे. या दगडाशेजारीच वीजेचा खांब असल्यामुळे तो खांब अन्यत्र हलवून या भागाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावले असले तरी त्यांच्या आठवणी आजही दडून आहेत. मुंबईतही ब्रिटिशांनी बांधलेल्या सीएसटीसह महापालिका मुख्यालय, राजाबाई टॉवर्स, उच्च न्यायालय आदी इमारती आजही मुंबईकरांसह पर्यटकांना भुरळ पाडतात. काही आठवणी या भुगर्भात दडल्या गेल्या आहेत. अशा वस्तू आता रस्ते खोदकामातून बाहेर पडत असून असाच एक मैलाचा दगड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सापडला. के. ई. एम जवळील एस. ए. राव मार्गालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना हा दगड सापडला. हा दगड सापडल्यानंतर त्याचे जतन करण्यासाठी एफ/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी पुढाकार घेतला आहे.

या दगडाचे जतन करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून प्रथम या दगडाचे जतन केले जाईल, त्यानंतर मुंबईतील अन्य दगडांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्याचा दगडाचा परिसर संरक्षित केला जाणार आहे. परंतु या दगडाशेजारी वीजेचा खांब असल्यामुळे मोठी अडचण येत आहे. त्यामुळे हा खांब बाजूला हलवला जाईल आणि त्यानंतर दगडाचा परिसर संरक्षित केला जाईल. 

- विश्वास मोटे, सहाय्यक आयुक्त, एफ/उत्तर विभाग

मैलाच्या दगडांचा पुरातन वास्तूंचा दर्जा?

ब्रिटिश राजवटीतील मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणारे मुंबई शहरात मैला-मैलावर रोवण्यात आलेले अंतर निर्देशक अर्थातच मैलाचे दगड शोधून त्यांना पुरातन वास्तूंचा दर्जा देऊन महापालिकेमार्फत त्यांचे जतन करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. मुंबईचा विकास करताना यापैकी काही दगडांचा थांगपत्ता लागलेला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि उदासीनतेमुळे मुंबईचा हा ऐतिहासिक वारसा नष्ट होत चालला असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

शहरात असे 32 मैलांचे दगड

मुंबईत 1800 च्या काळात थॉमस चर्च हॉर्निमल सर्कल येथून शहरातील रस्त्यावरील अंतर मोजले जात असे. त्यामुळे 

थॉमस चर्च - पहिला मैलाचा दगड

काळबादेवी - एक मैलाचा दगड

नळबाजार, इब्राहिम रहिमतुल्ला रोड - 2 मैलाचे दगड

माऊंट रोड, बँक ऑफ इंडिया जवळ - 3 मैलाचे दगड

ताडदेव रोड, जावजी दादाजी मार्ग - 3 मैलाचे दगड

केईएम रुग्णालय - 5 मैलाचे दगड

एन. एम. जोशी - 5 मैलाचे दगड

चित्रा सिनेमा - 6 मैलाचे दगड

लेडी जेमशेदजी रोड, शिवसेना भवन - 8 मैलाचे दगड.

यातील काही दगड आजही अस्तित्वात असल्याचे पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा