Advertisement

विकासकांकडून मंड्या ताब्यात घेण्यास सुधार समितीची आडकाठी


विकासकांकडून मंड्या ताब्यात घेण्यास सुधार समितीची आडकाठी
SHARES

मुंबईतील मंड्यांचा पुनर्विकास महापालिकेने स्वत:च करण्याचा निर्णय घेत यापूर्वी मंजूर केलेल्या पुनर्विकासाचे प्रस्ताव रद्द करण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यासाठी आधीचे पुनर्विकासाचे प्रस्ताव रद्द करण्यासाठी सादर झालेले प्रस्ताव सुधार समितीने मंजूर केलेले नाहीत. सुधार समिती अध्यक्षांना मंड्यांचा विकास हा महापालिकेमार्फत होण्याऐवजी विकासकांमार्फतच होण्यात अधिक स्वारस्य असल्यामुळे मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीपुढे आलेल्या तीन मंड्यांचे प्रस्ताव निकालाविना राखून ठेवण्यात आले आहेत.


कोणत्या आहेत या मंड्या?

सुधार समितीच्या बैठकीपुढे दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई, डोंगरी महापालिका मंडई आणि अंधेरी पश्चिम येथील दत्ताजी साळवी अर्थात अंधेरी महापालिका मंडई या तीन मंड्यांच्या पुनर्विकासाचे ठराव रद्द करण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले. मात्र, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी ते राखून ठेवले आहेत.


न्यायालयाचा निकालही विकासकांविरोधात

या तिन्ही मंड्यांचा पुनर्विकास खासगी विकासकामार्फत करण्यास महापालिकेने मंजुरी दिली होती. परंतु या मंड्यांचा पुनर्विकास न झाल्यामुळे महापालिकेने आपल्या धोरणात बदल केला. त्याला व्यापारी संस्थांनी न्यायालयात आव्हान दिले. मात्र, निकाल त्यांचा विरोधात गेला आणि यापूर्वी दिलेल्या मंजुरी रद्द करण्यात आल्या. मागील दोन वर्षांपासून या मंडईंच्या पुनर्विकासाचे ठराव रद्द करण्यासाठीचे प्रस्ताव सुधार समितीत मांडले जात आहे. यावर चर्चा करून पुन्हा हे प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवले होते.


मंड्या दुर्लक्षितच

या सगळ्या प्रकारामुळे या मंड्यांच्या विकासालाच खिळ बसलेली असून ना महापालिका यांची दुरुस्ती करत ना विकासक यावर लक्ष देत. त्यामुळे सुधार समिती अध्यक्षांच्या विकासकांवरील प्रेमामुळे महापालिका मंड्यांच्या विकास होत नसून परिणामी मंड्या मोडकळीस आलेल्या आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा