Advertisement

पाकिस्तानातून भारतीय बनावट नोटाची तस्करी करणारा अटकेत

पाकिस्तानातून आलेल्या बनावट नोटा कदाचित दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाऊ शकल्या असत्या असा धक्कादायक अंदाज गुन्हे शाखेने वर्तवलेला आहे.

पाकिस्तानातून भारतीय बनावट नोटाची तस्करी करणारा अटकेत
SHARES
पाकिस्तानातून दुबई मार्गे मुंबईत येणाऱ्या दोन हजारांच्या ते वीस लाखांच्या बनावट नोटा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हस्तगत केले आहेत. धक्कादायक म्हणजे बाजारात या नोटा जर बाहेर आल्या तर त्याला कोणीही सहजासहजी ओळखू शकत नाही अशा या नोटा आहेत. 2000 च्या नोटेप्रमाणेच अगदी सगळ्या बाजू बारकाईने निरीक्षण करून त्या नोटा बनवल्या गेल्या असल्याचा अंदाज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वर्तवला आहे.त्यामुळे त्या नोटा जर बाजारात बाहेर आल्या असत्या तर भारतीयांच्या डोळ्यात धूळफेक झाली असती.


दोन दिवसांपूर्वीच चीनमध्ये कनेक्शन असणारा एक टेलिकॉम एक्स्चेंज सेंटर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणलं होतं. यामध्ये परदेशातून कॉल करून तो भारतात मिळत आहे असं भासवलं जात होता आणि करोडो रुपयांची लूट सुद्धा केले जात होत. आज गुन्हे शाखेने केलेली ही महत्त्वपूर्ण कामगिरी असून पाकिस्तानातून आलेल्या बनावट नोटा कदाचित दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाऊ शकल्या असत्या असा धक्कादायक अंदाज गुन्हे शाखेने वर्तवलेला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईत 23 लाख 86 हजार इतक्या किमतीच्या 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात, याप्रकरणी कळवा परिसरात राहणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात ज्याने या नोटा दुबईतून भारतात आणल्या आहेत. जावेद गुलामनबी शेख असे या अटक करण्यात आलेल्या 36 वर्षीय आरोपीचे नाव आहे. हा कळवाचा राहणारा आहे.

अटक आरोपीची चौकशी केली असता या सगळ्या नोटा पाकिस्तानातून दुबई आणि दुबईतून भारतात आणल्या गेल्या असल्याचे त्याने सांगितलंय.पाकिस्तानातून या नोटा भारतात आल्याने कुठंल्या घातपाती कारवायांसाठी हा पैसा आला होता का या दिशेने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. बनावट नोटा 22 लाखांच्या असल्याने इतके सारे पैसे भारतात कोणत्या कामासाठी पुरवले जात होते आणि हे एक मोठे रॅकेट आहे का याचाही तपास सध्या सुरू आहे..
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा