Advertisement

वेतनवाढीसाठी डॉक्टरांच्या संघटनांचा जे. जे. रुग्णालयात एल्गार


वेतनवाढीसाठी डॉक्टरांच्या संघटनांचा जे. जे. रुग्णालयात एल्गार
SHARES

आपल्याला कामाचा ताण नाही. पण, दिलं जाणारं वेतन हे महिनाभराच्या खर्चासाठी अपुरं असल्याची तक्रार करत असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्रच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांनी जे. जे. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या वेतनात वाढ करावी या मागणीसाठी मोर्चा काढला.

राज्य सरकारच्या मेडिकल कॉलेजमध्ये १ वर्षाची इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या महिन्याला फक्त ६ हजार रुपये वेतन दिलं जातं. पण, आता हे वेतन ६ हजारांहून २൦ हजारांपर्यंत द्यावं अशी मागणी या शिकाऊ विद्यार्थ्यांनी केली आहे.

साडेचार वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एका वर्षांची सेवा सरकारी रुग्णालयात द्यावी लागते. त्यात हे विद्यार्थी आठवड्याला ६൦ ते ७൦ तास काम करतात. त्यामुळे सरकारने शिकाऊ मुलांना देण्यात येणाऱ्या वेतनात वाढ करावी या मागणीसाठी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्रच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन गुरुवारी जे. जे. रुग्णालयात निषेध व्यक्त केला.

२൦१५ मध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने प्रति महिना ११ हजार रुपये वेतनवाढीस मंजुरी दिली होती. पण, अनियमित पाठपुराव्यांमुळे ही वेतनवाढ अंमलात आणली गेली नसल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

फक्त महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजच्या इंटर्न्सना संपूर्ण देशात सर्वात कमी वेतन असल्याची खंतही या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. अन्य राज्यात इंटर्न्सना दर महिन्याला १५ ते २൦ हजार रुपये वेतन म्हणून दिले जातात. शिवाय, किमान वेतन धोरणानुसार, कुशल व्यक्तीला २४ हजार रुपये महिन्याचा पगार मिळणं अावश्यक असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं.

त्यामुळे, जर आपल्या मागण्या एका आठवड्यात मान्य नाही झाल्या तर आपण महाराष्ट्रभर अनिश्चित स्ट्राईकवर जाणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा