रस्ता खोदला खरा, काम होणार कधी?

 Sham Nagar
रस्ता खोदला खरा, काम होणार कधी?

जोगेश्वरी - जोगेश्वरी पूर्व परिसरातल्या सुभाषनगर भागातला अंतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी महिन्याभरापासून खोदून ठेवलाय. त्यामुळे या भागातल्या रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. रस्ता दुरुस्त होत नाही आणि माती-खडीचे ढिगारे रस्त्यावरच, असं चित्र पाहायला मिळतंय.

या खोदलेल्या रस्त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी नंदकुमार खेडेकर यांंनी दिलीय. याबाबत नगरसेविका उज्ज्वला मोडक यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, इंदिरानगरच्या झोपडपट्टीचा महत्त्वाचा प्रश्न सुटला की, रस्ता दुरुस्तीचं काम लवकरात लवकर सुरू करू.

Loading Comments