Advertisement

१० वी पर्यंत शिक्षण झालेल्यांसाठी 'या' ४ ठिकाणी नोकरीची संधी

हिंदूस्तान कॉपर लिमिटेड, रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पण या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी कसं जायचं? कुठे अर्ज भरायचा? याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

१० वी पर्यंत शिक्षण झालेल्यांसाठी 'या' ४ ठिकाणी नोकरीची संधी
SHARES

अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असतं. त्यात कमी शिक्षण असेल तर आपल्याला नोकरी कशी मिळेल असा अनेकांना प्रश्न पडतो. पण १० उत्तीर्ण असलेल्यांसाठी एक खुशखबर आहे. तुम्ही दहावी पास असाल तर लवकर या पदासाठी अर्ज करा आणि नोकरी मिळवा. 

१० वी पर्यंत शिक्षण झालेल्यांसाठी नोकरीची संधी आहे. हिंदूस्तान कॉपर लिमिटेड, रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पण या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी कसं जायचं? कुठे अर्ज भरायचा? याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत

) हिंदूस्तान कॉपर लिमिटेड

हिंदूस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत १६१ पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक अशा अनेक पदांसाठी भरती आहे. इच्छुक उमेदवार १०वी पास असणं गरजेचं आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. उमेदवारांना १०वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडलं जाईल. हिंदूस्तान कॉपर लिमिटेडची अधिकृत वेबसाईट hindustancopper.com ला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.

) एनआयटी आगरतळा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आगरतळानं विविध विभागाच्या असिस्टंट प्रोफेसर (ग्रेड 1 आणि 2) पदांकरिता अर्ज मागवले आहेत. यातील २ पदे बायो- इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग १, सिव्हिल इंजिनिअरिंग ८, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग ९, कॉम्प्यूटर विज्ञान आणि इंजिनिअरिंग ८, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार इंजिनिअरिंग ६ आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी ४ पदांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी http://hr.nita.ac.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.


) स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती होणार आहेया पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं गरजेचं आहे. अर्ज करणाऱ्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in भेट देऊ शकतात.

) रेल्वे

रेल्वे व्हिल फॅक्ट्रीमध्ये स्पोर्ट्स कोटाद्वारे विविध पदांसाठी नोकर भरती होणार आहे. किमान १८ आणि कमाल २५ वय असलेल्या उमेदवारांना चांगली संधी आहेतर सामान्य वर्गाच्या उमेदवारांसाठी ५०० रुपये अर्ज फी आहे. एससी/एसटी उमेदवारांसाठी २५० रुपये आहे. इच्छुक उमेदवार २४ फेब्रुवारीपर्यंत ऑफलाइन अर्ज भरू शकतात. अधिक माहितीसाठी indianrailways.gov.in वेबसाईटला भेट द्या.



हेही वाचा

मराठी शाळेत शिकले म्हणून नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार

जॉबच्या पहिल्या दिवशी या ८ गोष्टी नक्की करा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा