Advertisement

..तर एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी


..तर एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी
SHARES

मुंबईसह राज्यातील चाकरमान्यांना एसटी वाहतूक सेवा पुरवत आहे. मात्र, सध्या राज्यावर कोरोनाचा संकट असून, या कोरोनानं एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही टार्गेट केलं. परंतु, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांश सामान्य प्रवाशांना वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचारी आपला जीव धोक्यात वाहतूक सेवा देत आहेत. त्यामुळं या सेवेदरम्यान कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावरही नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 

अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय याआधी मुंबईतील बेस्ट उपक्रमानेही घेतला आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा शासनाचा नियम आहे. याची अंमलबजावणी एसटीकडून केली जात आहे. आतापर्यंत एसटीत ३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यातील पाच कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आर्थिक मदतीसाठी दावा केला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. आर्थिक मदतीचा लाभ केवळ कर्तव्यावर असताना करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळेल, असेही चन्ने यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा