काळाघोडा परिसरातील खुल्या कलादालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, २१ जणांची नोंदणी


SHARE

कलाकारांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत आणि प्रतिभावंत कलावंतांसाठी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमान जहांगिर आर्ट गॅलरीच्या शेजारी कालाघोडा परिसरात खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येत्या १९ नोव्हेंबरपासून प्रत्येक रविवारी हे कलादालन भरले जाणार असून येत्या रविवारी होणाऱ्या पहिल्याच शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या दिनासाठी आतापर्यंत २१ कलाकार आणि कला संस्थांनी नोंदणी केली आहे. यामध्ये बॉलिवूडच्या ११ कलाकारांसह प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि चित्रकार रुपाली मदन आदींचा समावेश आहे.


११ जणांचा प्रत्यक्ष सहभाग

मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे दिनांक १९ नोव्हेंबर, २०१७ पासून मे, २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी होणाऱ्या “खुले व्याहसपीठ” या संकल्पनेतून मुंबई शहराची ओळख संपूर्ण जगभर पोहचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याने २१ कलाकार/ कला संस्थांनी आजपर्यंत या महोत्सवात सहभागी होण्याणसाठी नोंदणी केल्या असून ११ जणांनी प्रत्यक्ष सहभागी होण्यांबाबतची कार्यवाही पूर्ण केली असल्याची महिती महापालिकेने दिली आहे.


अजोय मेहतांच्या मार्गदर्शनाखाली साकारली संकल्पना

के. दुभाष मार्गावरील हे खुले कलादालन बंद पडल्यानंतर अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड यांनी पुढाकार घेऊन पुन्हा हे कलादालन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात असून एकप्रकारे भारतीय पर्यटनाला अत्यंत पोषक असे वातावरण तयार करण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


किरण दिघावकर यांच्या कार्यवाहीला सुरुवात

सांस्कृतिक, कला, नाट्य, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्यांचे विविध प्रकार मुंबईकर नागरिक आणि मुंबईला भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना पाहता यावेत म्हणून सदर व्यासपीठ हे प्रथमच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कलादालनात २० गाळे उपलब्ध करून दिले असून त्याठिकाणी विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापली कला या व्यासपीठावर रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर, २०१७ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान सादर करता येणार आहे. अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी या जागेची पाहणी करून याठिकाणचा चौक, आजूबाजूच्या पदपथांची दुरुस्ती, चौकाची रंगरंगोटी आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करून हा परिसर आकर्षक बनवण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘ए’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी कार्यवाहीला सुरुवात केली आहे.


या क्रमांकावर करा नोंदणी

या खुल्या कलादालनातील व्यासपीठाचा लाभ घेऊन आपली कला सादर करण्यासाठी खालील क्रमांकावर आपली नोंदणी करू शकता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे (भ्रमणध्व.नी क्रमांक ८४२२८२२००३) आणि मुंबई महानगरपालिका ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (भ्रमणध्वनी क्रमांक ९९२०१८५२०१, कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांकः ०२२२२६६७०३८, फॅक्सःर ०२२२२६६०३९६), ‘ए’ विभागाचे तक्रार निवारण अधिकारी अमोल पाटील (भ्रमणध्वनी क्रमांक ९१६७४८०५३६), ‘ए’ विभागाचे कनिष्ठ अभियंता निलेश तोरसकर (भ्रमणध्वएनी क्रमांक ९८१९३२३८५०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच यासंबंधी अधिक माहितीसाठी http://m.facebook.com/mcskalaghoda/ या फेसबुक पेजवर भेट देण्याचेही आवाहन केले आहे.

संबंधित विषय