Advertisement

कल्पिता पिंपळेंच्या बोटांची शस्त्रक्रिया यशस्वी, दोन्ही बोटे जोडण्यात यश

कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी कारवाईच्या दरम्यान एका फेरीवाल्याकडून जीवघेना हल्ला करण्यात आला होता.

कल्पिता पिंपळेंच्या बोटांची शस्त्रक्रिया यशस्वी, दोन्ही बोटे जोडण्यात यश
SHARES

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या बोटावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याची दोन्ही बोटे जोडण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. पिंपळे यांच्या बोटांचा शोध घेण्यामध्ये यश मिळाले असले तरी,त्यांच्या अंगरक्षकाचे बोट मात्र मिळू शकलेले नाही.

कल्पिता पिंपळे यांच्या जोडण्यात आलेल्या बोटांमध्ये चेतना येणार की नाही? हे ४८ तासांच्या नंतर स्पष्ट होणार असल्याचं डॉक्टरांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर पिंपळे यांची प्रकृतीही आता स्थिर असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिली आहे.

माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी कारवाईच्या दरम्यान एका फेरीवाल्याकडून जीवघेना हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटून पडली होती. सुरुवातीला वेदांत आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डाव्या हाताची तुटून पडलेली बोटे तीन शस्त्रक्रिया करून जोडण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याच्या दावा डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आला आहे. मात्र जोडलेल्या बोटांमध्ये पुन्हा चेतना येईल की नाही याबाबत पुढच्या ४८ तासांच्या नंतरच परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचं रुग्णालयांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यासमवेत त्यांच्या अंगरक्षकाच्या हाताचं बोट देखील या हल्ल्यात तुटले होते. पिंपळे यांच्या बोटांचा शोध घेण्यामध्ये यश मिळाले असले तरी,त्यांच्या अंगरक्षकाचे बोट मात्र मिळू शकलेले नाही. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या बोटांचा शोध घेण्यात आला. मात्र त्यांचे बोट न सापडल्यामुळे त्यांच्या अंगरक्षकाला आपले बोट गमवावे लागले आहे.

पालकमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी मनपा अधिकार्‍यांवर अशाप्रकारे केलेला हल्ला खपवून घेतला जाणार नसून या प्रकरणातील आरोपी फेरीवाल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं.

शहरातील अनधिकृत फेरीवाल्याविरोधातली कारवाई यापूढेही सुरूच ठेवणार असल्याच सांगितलं. शहरातील फेरीवाल्यांना त्याना आखून दिलेल्या ’हॉकर्स झोन’ मध्ये व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र त्याव्यतिरिक्त पदपथ अडवून धंदा करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रुग्णालयात जाऊन कल्पना पिंपळे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांना म्हणाले की, तुम्ही पूर्णपणे बरे व्हा, बाकी काय करायचं ते आम्ही बघू. 


हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा