पथनाट्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती

परळ - पालिकेच्या स्वच्छतेबाबत जनजागृतीच्या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी रंगकर्मी ग्रुप गोरेगाव हा ग्रुप सहावर्षापासून पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश देतो. याचाच एक भाग म्हणून परळच्या सोशल सर्व्हिस लीग शाळेच्या आवारात यंदा पथनाट्य सादर केलं.

परिसर अस्वच्छ ठेवल्यानं आरोग्यावर काय परिणाम होईल, तसंच त्यामुळे निर्माण होणारे आजार यावर पथनाट्य सादर करण्यात आलं. या वेळी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे टाळा यासाठीही शपथ घेण्यात आली. 

Loading Comments