SHARE

चेंबूर - हार्बर रेल्वे मार्गावरील चेंबूर रेल्वेस्थानक नेहमीच स्वच्छतेच्या आघाडीवर मागे राहिलंय. या स्थानकाला नेहमीच फेरीवाल्यांचा विळखा असतो. त्यामुळे नेहमीच मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं. सध्या तर या स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारीच कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतायत. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधीही पसरते आहे. प्रवाशांना स्थानकात जाताना किंवा बाहेर येताना अक्षरशः नाक मुठीत धरावं लागतंय. रेल्वे प्रशासन जर तिकिटविक्रीतून इतकी कमाई करत असेल, तर त्यांनी स्थानक आणि परिसरही स्वच्छ ठेवणे गरजेचे नाही का, असा सवाल राहुल वाघ या प्रवाशाने केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या