Advertisement

नौदलाच्या ताफ्यात 'खांदेरी' दाखल


SHARES

माझगाव - 61 मीटर लांब, 60 मीटर रूंद. महाकाय, विशाल आणि शत्रुचा खात्मा करण्यास सज्ज अशी ही खांदेरी पाणबुडी. शत्रुला सळो की पळो करण्याची क्षमता असलेली ही खांदेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात अगदी थाटामाटात दाखल झाली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते खांदेरीचे जलावतरण मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आले.

खांदेरीची वैशिष्ट्ये

  • आधुनिक आणि नव्या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर
  • युद्धनौका आणि पाणबुड्या यांचा खात्मा करण्यास सज्ज
  • पाण्यात आणि भूपृष्ठावर मारा करणा-या क्षेपणास्त्रांनी सज्ज
  • मार्गदर्शक शस्त्रास्त्रांचा वापर करून शत्रूचे कंबरडे मोडण्याची क्षमता
  • शत्रूच्या पाणबुडीच्या किंवा युद्धनौकेच्या कक्षेत न सापडणे
  • खांदेरी पाणबुडी डिझेल आणि वीजेवर चालणारी
  • अचूक मिसाईल डागण्याची क्षमता

17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या ‘खांदेरी’ या किल्ल्याच्या नावावरून या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले आहे. यापूर्वीही डिसेंबर १९६८ साली कलवरी श्रेणीतील डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी ‘आयएनएस खांदेरी’ नौदलात सामील करण्यात आली होती. 21 वर्षाच्या देशसेवेनंतर १९८९ साली ही पाणबुडी नौदलातून निवृत्त झाली.
सेवेतून निवृत्त झालेल्या युद्धनौका आणि पाणबुडय़ांची नव्याने उभारणी करून पुन्हा नौदलात रूजू करण्याची भारतीय नौदलाची परंपरा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा