Advertisement

'ब्लॅक बॉक्स' म्हणजे काय रं भाऊ ?

घाटकोपर विमान अपघातानंतर या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अपघातापूर्वी वैमाज्ञिक आणि कंट्रोल रुममध्ये काय संभाषण झालं हे ब्लॅक बॉक्समुळे समजेल. त्यावरून हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकेल. पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? त्याचा काय उपयोग? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

'ब्लॅक बॉक्स' म्हणजे काय रं भाऊ ?
SHARES

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टड विमान कोसळलं. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरून या विमानानं उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं.

या अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अपघातापूर्वी वैमाज्ञिक आणि कंट्रोल रुममध्ये काय संभाषण झालं हे ब्लॅक बॉक्समुळे समजेल. त्यावरून हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकेल. पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? त्याचा काय उपयोग? असे प्रश्न अनेकांना पडले असतीलतुमच्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे


ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

1) प्रत्येक विमानाच्या मागील भागात बसवलेला फ्लाइट डाटा रेकॉर्डर (एफडीआर)किंवा ब्लॅक बॉक्स सर्वात महत्त्वाचा भाग आहे.  या उपकरणाच्या मदतीनं अपघाताच्या कारणांचा शोध लावणं सोपं जातं.

2) आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये विमानाचा मागील भाग बऱ्याचदा सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हे उपकरण मागे लावण्याचा निर्णय घेण्यात आला

3) उपकरणाच्या सुरक्षतेसाठी त्यावर अनेक सुरक्षा आवरणं असतात. त्यामुळे अपघाताच्या वेळी आग, पाणी, वारा अशा प्रतिकूल स्थितीतही त्याचं रक्षण होतं. समुद्रात ब्लॅक बॉक्स ६००० फुटांवर पाण्याखाली सुरक्षित राहू शकतो

4) विमानाच्या महत्त्वाच्या उपकरणांमध्ये कॉकपिटमध्ये बसवलेले व्हॉईस रेकॉर्डरही महत्त्वाचे असतात. हे उपकरण कॉकपिटच्या आवाजाव्यतीरिक्त रेडिओ ट्रासमिशनही रेकॉर्ड करते.  

5) विमानाच्या मागील पंखांमध्ये बसवण्यात आलेल्या या उपकरणाचा रंग नारंगी असतो. अपघाताच्या वेळी हा बॉक्स सहज सापडावा यासाठी त्याचा रंग लाल किंवा नारंगी ठेवण्यात येतो.


कुणी लावला ब्लॅक बॉक्सचा शोध?

विमान अपघातातील कारणांचा शोध लावण्याच्या उद्देशानं मेलबॉर्नच्या एअरॉनॉटिकल रिसर्च लॅबोरेट्रीजच्या डेव्हीड वॉरेन याने १९५३ साली ब्लॅक बॉक्सचा शोध लावला. १९६० सालापासून ऑस्ट्रेलियात विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स लावणं सक्तीचं केलं. त्यानंतर १ जानेवारी २००५ सालापासून भारतातील सर्व विमानं आणि हॅलिकॉप्टरमध्ये ब्लॅक बॉस बसवणं सक्तीचा करण्यात आलं



हेही वाचा-

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून ५ जणांचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा