एम पश्चिम प्रभागात सध्या एकूण ७ नगरसेवक आहेत. मात्र, महापालिकेच्या नवीन प्रभाग नकाशा रचनेत आता या प्रभागातून ८ नगरसेवक असणार आहेत. म्हणजेच या प्रभागातील नगरसेवकांची संख्या १ ने वाढली आहे. एम वेस्ट वॉर्ड १९.३७ चौ. किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ४,११,८९३ इतकी आहे.
या वॉर्डची हद्द
पूर्व सीमा डब्ल्यूटी पाटील मार्ग, जीएम लिंक रोड, पश्चिम सीमा ४८” तानसा पाइपलाइनपर्यंत विस्तारलेली आहे. उत्तरेकडील सीमा सोमय्या नाल्यापर्यंत आणि दक्षिणेकडील सीमा माहुल खाडीपर्यंत पसरलेली आहे. क्षेत्रफळ 19.37 चौरस किमी आहे.
एम पश्चिम वॉर्ड कार्यालयाचा पत्ता
म्युनिसिपल ऑफिस बिल्डिंग, कै.शरदभाऊ आचार्य मार्ग, नटराज सिनेमाजवळ, चेंबूर, मुंबई - 400 071
एम पश्चिम वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक
वॉर्ड नंबर | नगरसेवक | पक्ष |
---|---|---|
वॉर्ड नंबर १४९ | सुषम गोपाळ सावंत | |
वॉर्ड नंबर १५० | संगीता चंद्रकांत हंडोरे | कॉंग्रेस |
वॉर्ड नंबर १५१ | राजेश ओमप्रकाश फुलवरिया | भाजपा |
वॉर्ड नंबर १५२ | आशा सुभाष मराठे | भाजपा |
वॉर्ड नंबर १५३ | अनिल रामचंद्र पाटनकर | शिवसेना |
वॉर्ड नंबर १५४ | महादेव शंकर शिवगण | भाजपा |
वॉर्ड नंबर १५५ | श्रीकांत गोविंद शेट्टी | शिवसेना |
महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या
वॉर्ड नंबर १५३ - महापालिका गार्डन, जॉगर्स पार्क, छेडानगर जिमखाना, मॉडर्न इंग्लिश स्कूल, टिळक नगर पोलिस स्टेशन आणि जवळपासचा परिसर.
फोटो -
वॉर्ड नंबर १५४ - सीफूड मार्केट, शंकरालय मंदिर, प्रियदर्शनी बुद्ध विहार, मायकल प्लाझा आणि जवळपासचे परिसर.
फोटो -
वॉर्ड नंबर १५५ - गोदरेज सेंट्रल, नाना नानी पार्क, सहजीवन पार्क, कार्तिक हायस्कूल, हॉटेल सनी आणि जवळपासचा परिसर.
फोटो -
वॉर्ड नंबर १५६ - चेंबूर भाजी मंडई, सिग्नेचर बिझनेस पार्क, सुश्रुत हॉस्पिटल, साई हॉस्पिटल, आंबेडकर गार्डन आणि जवळपासचा परिसर.
फोटो -
वार्ड नंबर १५७ - हिंदुस्थान बँक, कर्नाटक हायस्कूल, अंबेमाता मंदिर, सोमप्रभा पार्क, मन्नत टॉवर आणि जवळपासचा परिसर.
फोटो -
वॉर्ड नंबर १५८ - आशीर्वाद हॉस्पिटल, मैत्री पार्क, गंगाधर देशमुख हॉल, आशिष थिएटर, शितला माता मंदिर आणि आजूबाजूचा परिसर.
फोटो -
वॉर्ड नंबर १५९ - भक्ती भवन, चेंबूर पोलीस स्टेशन, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी, रॉयल इंटरनॅशनल स्कूल आणि जवळपासचा परिसर.
फोटो -
वार्ड नंबर १६० - ट्रॉम्बे इंडस्ट्रियल एरिया, इमॅक्स गार्डन, माहुल गार्डन, टाटा पॉवर, बीपीसीएल रिफायनरी आणि जवळपासच्या परिसर.
फोटो -