Advertisement

सातबंगला, अक्सा, मनोरी चौपाटी रंगीत दिव्यांनी झळकणार!

अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरातील चौपाटीवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सात बंगला चौपाटीवर सुशोभित दिव्यांचा पुरवठा, तसेच उभारणी करण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

सातबंगला, अक्सा, मनोरी चौपाटी रंगीत दिव्यांनी झळकणार!
SHARES

मुंबईतील जुहू चौपाटीवर रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानंतर आता मालाडमधील आक्सा, मनोरी, सिल्व्हर बीचसह अंधेरीतील सातबंगला आदी चार समुद्र किनारपट्टीही रंगीबेरंगी आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे.


सुशोभिकरणासाठी ७५ लाखांचा खर्च!

मुंबईतील चौपाटीवर आकर्षक दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर जुहू चौपाटीवर या प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यानुसार आता अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरातील चौपाटीवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सात बंगला चौपाटीवर सुशोभित दिव्यांचा पुरवठा, तसेच उभारणी करण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.


इलेक्ट्रोकूल इंजिनिअरिंग कंपनीला कंत्राट

याव्यतिरिक्त मालाड पश्चिम येथील मनोरी समुद्र किनारा, सिल्व्हर बीच आणि अक्सा समुद्र किनारा या तिन्ही चौपाट्यांवरही रंगीत दिव्यांची विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या सर्व चौपाट्यांवरील विद्युत रोषणाईचे कंत्राट हे इलेक्ट्रोकूल इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले असून प्रत्येक चौपाटीसाठी सरासरी ६५ ते ७० लाख रुपयांचा खर्च हा दिव्यांच्या उभारणीसह पुढील देखभालीसाठी राहणार आहे.



हेही वाचा

पर्यटकांसाठी सीएसटीएम परिसरातील वीजेचे १६ खांब पालिका हटविणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा