लिंक रोड फेरिवाल्यांच्या विळख्यात

 Dahisar
लिंक रोड फेरिवाल्यांच्या विळख्यात
लिंक रोड फेरिवाल्यांच्या विळख्यात
लिंक रोड फेरिवाल्यांच्या विळख्यात
लिंक रोड फेरिवाल्यांच्या विळख्यात
लिंक रोड फेरिवाल्यांच्या विळख्यात
See all

दहिसर -  पश्चिमेच्या लिंक रोडवरील जवळपास 10 फुट अंतरावर फेरिवाल्यांनी कब्जा केलाय. याशिवाय येथे पार्किंगही केली जाते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

दहिसर पश्चिमेच्या गणपत पाटीलनगरच्या समोर 120 फुटाचा रोड असून मध्ये डिव्हायडर आहे. बोरिवलीहून चेकनाकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या 30 फूट अंतरावर एकीकडे एमएमआरडीएचं काम सुरू आहे. तर दुसरीकडे 10 फुटाच्या अंतरावर फेरिवाल्यांनी कब्जा केलाय. याबाबत एका अधिकाऱ्यांने सांगितलं की, इथे कारवाई केल्यास त्यात राजकीय हस्तक्षेप केला जातो.

Loading Comments