Advertisement

अंबरनाथमध्ये ६ जुलैपर्यंत वाढला लॉकडाऊन


अंबरनाथमध्ये ६ जुलैपर्यंत वाढला लॉकडाऊन
SHARES
Advertisement

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळं परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यानं काही भागात कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. असाच एक परिसर म्हणजे अंबरनाथ. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंबरनाथमध्ये ६ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

अंबरनाथ महापालिकेनं याबाबत निर्णय जाहिर केला आहे. याआधी ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. ६ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दूकान वगळता इतर सर्व दुकान बंद ठेवण्यात येणार आहे.

अंबरनाथमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, आरोग्यामध्ये बिघाड झाल्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं गरजेच आहे. तसंच, गर्दी टाळणं देखील खुप महत्वाच आहे.

अंबरनाथमध्ये दुकान बंद ठेवली जाणार आहेत. गर्दी होणाऱ्या ठिकाणी करवाई केली जाणार आहे. दूध, फळ, भाजी आणि औषध यांची डिलेव्हरी सकाळी ८ ते ५ या वेळेत करता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement