पेट्रोल डिझेलनंतर आता सिलेंडरही महागला

केंद्र सरकराने वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना तिहेरी धक्का दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 59 रुपयांची तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2.89 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

SHARE

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू असतानाच आता घरगुती गॅसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 59 रुपयांची तर घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 2.89 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा खिसा आता आणखी खाली होणार आहे. शिवाय यंदा सर्वसामान्यांची दिवाळीही महागणार आहे.

सर्वसामान्यांना धक्का

केंद्र सरकराने वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना तिहेरी धक्का दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 59 रुपयांची तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2.89 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सर्वसामान्य हैराण

रुपयाचे अवमुल्यन आणि आंतराष्ट्रीय बाजारात तेलाचे वाढते भाव याचा परिणाम इंधनाच्या दरांवर होत असून सर्वसामान्यांचे कंबरडं पुरते मोडलं आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90.84 आणि डिझेल 79.40 रुपयांवर पोहचले असतानात आता गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या