Advertisement

महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार - महापौर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असून, चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार आहे.

महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार - महापौर
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असून, चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार आहे. आंबेडकरी अनुयायी यांची सर्व व्यवस्था महानगरपालिका करणार आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील अनुयायांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आवाहन केलं आहे की, त्यांनी ऑनलाइन अभिवादन करावे. बाहेरून येणारी लोक पाहता कोविड नियमांचे पालन करावे. फार गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रोनचेही संकट समोर आहे.

ऑनलाइन अभिवादन दिवसभर सुरू राहणार आहे. महानगरपालिका सज्ज असल्याचंही महापौर यांनी म्हटलं. ओमायक्रोनचं संकट पाहता सर्वांनी सतर्क राहावं. प्रत्येकानं काळजी घ्यावी. ओमायक्रोनचं संकट गंभीरतेनं घ्यावं लागेल. मुंबईत दररोज ४ फ्लाईट येतात त्यात २ हजार प्रवासी दररोज येतात.

काही परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी काही लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळं ही खबरदारी घेण्यात येत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांचं जिनोम सिक्वेन्सीग आपण पाठवलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नायरमधील डॉक्टरांची चौकशी होणार होणार आहे. आपण नायर हॉस्पिटलला १.१५ वाजता जाणार आहे. डॉक्टरांनी निर्दयी होऊ नये, असंही त्यांनी म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा