Advertisement

राज्यात ३१ हजार १११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात सोमवारी नव्याने ३१ हजार १११ कोरोना रूग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ७२ लाख ४२ हजार ९२१ इतकी झाली आहे.

राज्यात ३१ हजार १११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
SHARES

महाराष्ट्रात सोमवारी नव्याने ३१ हजार १११ कोरोना रूग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ७२ लाख ४२ हजार ९२१ इतकी झाली आहे. मागील २४ तासात राज्यात २४ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह एकूण कोरोना मृत्यूंची संख्या १ लाख ४१ हजार ८३२ इतकी झालीय. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे.

राज्यात सोमवारी २९ हजार ९२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ६८ लाख २९ हजार ९९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३ टक्के एवढा झाला आहे.

सोमवारपर्यंत राज्यात एकूण ७ कोटी २१ लाख २४ हजार ८२४ नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७२ लाख ४२ हजार ९२१ (१०.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. राज्यात सध्या एकूण २ लाख ६४ हजार ४४१ सक्रीय करोना रुग्ण आहेत. राज्यात सद्यस्थितीत २२ लाख ६४ हजार २१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सोमवारी राज्यात १२२ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत.

ओमायक्रॉन बाधित रूग्ण

  • पुणे–४०
  • मीरा भाईंदर- २९
  • नागपूर-२६
  • औरंगाबाद- १४
  • अमरावती-७
  • मुंबई- ३
  • भंडारा, ठाणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा