Advertisement

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ


राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ
SHARES

राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसख्येत किंचित वाढ झाली असली तरी मृ्त्युसंख्येत घट झाली आहे. तसंच राज्यात एकूण ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ६६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शुक्रवारी ८५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात ८ हजार १०६ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ८० हजार ०६१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ५१ लाख ५५ हजार २९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ३२ हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

हे प्रमाण १०.१८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७८ हजार १२२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ८९१ इतकी आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत बुधवारी २२४ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६२ हजार १६४ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३२२ इतकी आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा