Advertisement

महाराष्ट्रात एकाच दिवसात आढळले ऑमिक्रॉनचे 'इतके' नवे रुग्ण

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉन हा संपुर्ण महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. परिस्थिती गंभीर होत असून, महाराष्ट्रात ऑमिक्रॉननं टेन्शन वाढवलं आहे.

महाराष्ट्रात एकाच दिवसात आढळले ऑमिक्रॉनचे 'इतके' नवे रुग्ण
SHARES

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉन हा संपुर्ण महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. परिस्थिती गंभीर होत असून, महाराष्ट्रात ऑमिक्रॉननं टेन्शन वाढवलं आहे. मिळलेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात ३१ नव्या ऑमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.

या ३१ नव्या प्रकरणांपैकी २७ रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर २ जण ठाण्यात, १ जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ऑमिक्रॉन बाधितांचा एकूण आकडा १४१ वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२२ नवे रुग्ण आढळून आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत, बीएमसी आयुक्तांनी नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यात खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश आज रात्री १२ वाजल्यापासून लागू झाला आहे.

महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये, रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जिम, स्पा, हॉटेल्स, थिएटर्स आणि सिनेमा हॉलसाठी ५० टक्के क्षमतेचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा