Advertisement

गृहरक्षक दलाच्या जवानांना आणखी एक संधी

विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्डसना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

गृहरक्षक दलाच्या जवानांना आणखी एक संधी
SHARES

विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्डसना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने (maharashtra government) घेतला आहे. याकरीता नव्याने परिपत्रक काढण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

होमगार्डसना पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत गृहरक्षक दलाने परिपत्रक काढलं होतं. परंतु या परिपत्रकाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यावर  प्रधान सचिव यांनी सर्व जिल्ह्यातील वस्तुस्थिती तपासून त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गृहरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील गृहरक्षक दलाच्या विविध समस्यांबाबत राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. काही जिल्ह्यांमध्ये गृहरक्षक दलाचे बंदोबस्त मानधन अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ते देण्याच्या दृष्टीने वित्त विभागाकडून प्राप्त निधी बीडीएसवर प्राप्त झाल्यावर ५ दिवसात ते मानधन होमगार्डसना देण्याबाबत परिपत्रक काढावं, असे निर्देशही राज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी दिले.

हेही वाचा- राज्यात मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार मिळाला

होमगार्डसना विमा योजनेचा कशाप्रकारे लाभ देता येईल, यासंदर्भात विमा कंपनीशी तांत्रिक बाबींवर चर्चा करावी. अपर पोलिस अधीक्षक यांनी होमगार्ड समस्यांबाबत प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेऊन होमगार्डसच्या समस्यांचा आढावा घ्यावा. सद्यस्थितीत राज्यात कोविड-१९ परिस्थितीमुळे वय वर्षे ५० ते ५८ वर्षे वयाच्या होमगार्डसना कोविड-१९ चा धोका पाहाता बंदोबस्तकामी बोलाविण्यात आलेलं नाही. मात्र ५० ते ५८ वर्षांवरील होमगार्ड सदस्यांना कोविड (covid 19) संसर्ग कमी असलेल्या भागात (विशेषत: Level 1) त्यांची सुरक्षा विचारात घेऊन बंदोबस्त देण्याबाबत विचार करण्यात यावा, असे  निर्देशही राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

या बैठकीस प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक प्रशांत बुरडे, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, होमगार्ड विकास समितीच्या अध्यक्ष आर.डी. लाखन आदी मान्यवर दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.

(maharashtra government to issue new notification for home guards to resume on duty)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा