Advertisement

टाकाऊ फुलांपासून माहीम चर्चने केली बायोगॅसची निर्मिती


टाकाऊ फुलांपासून माहीम चर्चने केली बायोगॅसची निर्मिती
SHARES

प्रार्थनेसाठी येणारे अनेक भाविक माहीमच्या चर्चमध्ये फुले अर्पण करतात. मात्र पर्यावरणाच्या रक्षणाची कास धरत चर्च व्यवस्थापनाने या फुलांपासून बायोगॅसची निर्मिती केली आहे. माहीमच्या चर्चमध्ये दर बुधवारी मोठ्या संख्येने भाविक प्रार्थनेसाठी येतात. या दिवशी जवळपास 50 ते 60 किलो फुले या चर्चमध्ये भाविक अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी ही फुले कचऱ्यात टाकली जात होती. पण आता फुलांपासून बायोगॅसची निर्मिती होत आहे. चर्चमध्ये येणारे भाविक एमानुएल डिसिल्व्हा यांच्या संकल्पनेतून चर्चच्या व्यवस्थापनाने फुलांपासून बायोगॅसची निर्मिती केली आहे.

आठवड्याला साचणाऱ्या 50 किलो फुले आणि फुलांच्या दुप्पट पाण्याने बायोगॅस निर्मिती होते. बायोगॅस प्रक्रियेनंतर निघालेल्या फुलांच्या वेस्टपासून खत निर्मिती होते आणि या खताच्या वापराने चर्चच्या गच्चीवर सुंदर बाग फुलली आहे. कडक उन्हात देखील ही बाग ताजी आणि फुलांनी बहरलेली आहे. बायोगॅस प्लांट खरोखरच खूप उपयोगी आहे. यामुळे मेहनत वाचते. पर्यावरण रक्षण करण्यास मदत होते. आमची बाग बायोगॅसमुळेच पर्यावरणपूरक झाली आहे.


- सुरेश उल्हारे, चर्चचे कर्मचारी


ग्रीन चर्च संकल्पेनेची आम्ही सुरुवात केली आहे. जेणेकरून इथे येणाऱ्या भाविकांमध्ये देखील पर्यावरण रक्षणाची गोडी निर्माण होईल. आता बायोगॅस प्लांट आहे. त्याचबरोबर सेंद्रीय खत निर्मिती देखील करत आहोत. यापुढे जाऊन सौरऊर्जा प्लांट बसवण्याचा विचार आहे. जेणेकरून प्रदूषण कमी करण्याचा आणि पर्यावरण रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. - सिमोन बोर्गेस, चर्चचे व्यवस्थापकइतर धार्मिक स्थळांच्या तुलनेने चर्चमध्ये कमी फुलं येतात. आठवड्याला जी 50 ते 60 किलो फुलं येतात, त्यापासून एक ते दीड तास दररोज चालेल इतक्या बायोगॅसची निर्मिती होते. संपूर्ण मुंबईमधील फुलांचा अंदाज घेतला असता दररोज 200 टन फुलं कचऱ्यात टाकली जातात. यातील काही समुद्रात फेकली जातात. या फुलांच्या सहाय्याने बायोगॅसची निर्मिती करून दर दिवसाला 50 बेस्ट बसेस चालू शकतील. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात देखील दररोज कितीतरी किलो फुले अर्पण केली जातात. जर चर्च फक्त एका आठवड्याच्या फुलांच्या सहाय्याने दररोज एक ते दीड तास बायोगॅस निर्मिती करू शकतो, तर मंदिरात तर नैवेद्य बनवण्यासाठी लागणारे दररोजचे( इंधन) बायोगॅस या फुलांच्या सहाय्याने यशस्वीपणे बनू शकते. गरज आहे ती मंदिर प्रशासनाने लक्ष देण्याची तसेच इतर धार्मिक स्थळांमध्ये देखील हा प्रकल्प यशस्वीपणे करता येण्यासारखा आहे.
- डॉ. एमानुएल डिसिल्व्हा, भाविकहे देखील वाचा - 

कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा