Advertisement

माहिम किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर


माहिम किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर
SHARES

मुंबई हे एक बेट अाहे आणि या बेटावर वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंच्या पाऊल खूणा आपल्याला आजही आढळून येतात. मात्र विकासाच्या नावावर दिवसेंदिवस मुंबई शहरात अनेक गोष्टी नामशेष होतानाचं चित्र पहायला मिळत आहे. अशा नामशेष होत असलेल्या या गोष्टींपैकी एक म्हणजे माहिम फोर्ट (माहिमचा किल्ला). मुंबई शहरात वरळीसारख्या विभागामध्येही  झोपड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात पहायला मिळत आहे. वरळीची प्रेमनगर झोपडपट्टी डोंगरावर वसलेली दिसून येते. त्याचप्रमाणे माहिम किल्ल्यावर देखील अनअधिकृतपणे झोपड्यांचे प्रमाण वाढलेले पहायला मिळत आहे. एखाद्या दुर्घटनेत किल्याचा समुद्रालताचा बुरुज कोसळण्याची शक्यता किल्याकडे पाहिल्यानंतर जाणवते.

माहिमचा किल्ला शिल्लक राहिलेल्या एका तटबंदीमुळेच किल्ला आहे असे वाटते. अन्यथा किल्ला प्रचंड दुरावस्थेत असल्यामुळे नवख्या व्यक्तीला या ठिकाणी किल्ला आहे असं वाटणार नाही. हा किल्ला दिवसेंदिवस कोसळत आहे. मुंबई महापालिकेने यावरील अतिक्रमण हटवावे आणि पुरातत्व विभागाने लक्ष घालून या किल्याचा राहिलेला भाग जतन करावा, अशी अनेक जाणकार रहिवाशांची अपेक्षा आहे.


आम्ही कोळी असल्यामुळे गेली 40 वर्षे हा किल्ला पहात आहोत. मी लहान असताना किमान या किल्ल्याला किल्ला म्हणावा असे एक दोन बुरुज भक्कम असल्याचे आम्हाला दिसायचे. परंतु दिवसेंदिवस या किल्ल्यावर झोपड्यांचे अतिक्रमण होत असल्यामुळे किल्याचा सध्या एकच बुरुज शिल्लक राहिला आहे. महापालिकेने अतिक्रमण न हटवल्यामुळं आणि पुरातत्व विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळं किल्ला दुरावस्थेत गेला आहे.

रुपेश तांडेल, स्थानिक

हा किल्ला जी उत्तर विभागात येत असला तरीही यावरील अतिक्रमणांवर महापालिका कारवाई करू शकत नाही. कारण हा किल्ला पुरातत्व खात्याकडे आहे. याचे जतन संरक्षण हे पुरातत्व विभागाचे काम आहे. महापालिकेचे नाही. पुरातत्व विभागाने लक्ष घालून हा किल्ला जतन केला तर अत्यंत चांगली बाब आहे. इतिहासातील वास्तू जपल्या जातील.

रमाकांत बिरादार - सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा