माहिम सबवे नागरिकांसाठी खुला

 Mahim Railway Station
माहिम सबवे नागरिकांसाठी खुला
माहिम सबवे नागरिकांसाठी खुला
माहिम सबवे नागरिकांसाठी खुला
माहिम सबवे नागरिकांसाठी खुला
माहिम सबवे नागरिकांसाठी खुला
See all

माहिम - गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला माहिम सबवे मंगळवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. 2005 ते 2008 दरम्यान या सबवे चे कामकाज सुरु होते. चुकलेल्या स्ट्रक्चरमुळे दुपदरी मार्गासाठी तयार करण्यात येत असलेला हा सबवे अर्ध्यावरचं एकाच रोडसाठी तयार करण्यात आला. पाण्याची मुख्य पाइप लाईन कामकाजा दरम्यान मध्यावरचं आडवी येत असल्यामुळे हा सबवे एकाच रोड साठी बनवण्यात आला होता. 2008 साली सबवेचे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त 15 दिवस सुरु ठेवण्यात आला होता.

तसेच सबवेमध्ये लावण्यात आलेल्या लाईटही चोरीला गेल्याचं उघडकीस आलं होते. त्यामुळे सबवेच्या देखरेखीसाठी एक वॉचमन असावा अशी स्थानिकांनी पालिकेला मागणी केली होती. अखेर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेला मुहुर्त सापडला.

Loading Comments