
मुंबईच्या (mumbai) पायधुनी परिसरात टरबूज खाल्ल्याने एका कुटुंबाचा गूढरित्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रहिवाशांमध्ये भीती आणि घबराट पसरली आहे. इतकेच नाही, तर या कडक उन्हात रसरशीत कलिंगड हे खाल्ल्या जाणाऱ्या प्रसिद्ध फळांपैकी एक आहे.
मात्र, या घटनेनंतर नवी मुंबईच्या (navi mumbai) एपीएमसी बाजारात (APMC) कलिंगडाच्या किंमतीत आणि मागणीत मोठी घट (price drop) झाली आहे, असे एनडीटीव्हीच्या एका अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, कलिंगडाचा (watermelon) नेहमीचा घाऊक दर (prices)10 ते 35 रुपये प्रति किलो असताना, ते 5 ते 7 रुपये प्रति किलो दराने विकले जात असल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान होत आहे.
किरकोळ बाजारात टरबूज साधारणपणे 30 ते 100 रुपये प्रति किलो दराने विकले जाते. उन्हाळ्यातील लोकप्रिय फळांपैकी एक असूनही, मागणी कमी असल्याने व्यापाऱ्यांना सततच्या नुकसानीची चिंता वाटत आहे.
अब्दुल्ला डोकाडिया (40), त्यांची पत्नी नसरीन (35) आणि त्यांच्या मुली आयेशा (16) व झैनब (13) या 4 जणांच्या कुटुंबाने शनिवारी रात्री भेंडी बाजार येथील मुघल बिल्डिंगमधील त्यांच्या निवासस्थानी बिर्याणी खाल्ली होती.
या जेवणात नऊ जण एकत्र होते, त्यापैकी पाच नातेवाईकांना कोणतीही आरोग्य समस्या जाणवली नाही. नातेवाईक निघून गेल्यानंतर, अब्दुल्ला आणि त्याच्या कुटुंबीयांनी झोपण्यापूर्वी घरी उरलेले कलिंगड खाल्ले, असे सांगण्यात आले आहे.
पहाटेच्या वेळी, त्या चौघांनाही तीव्र पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. एका स्थानिक डॉक्टरला बोलावण्यात आले आणि त्यांनी औषधोपचार केले, ज्यामुळे तात्पुरता आराम मिळाला.
मात्र रविवारी सकाळी सुमारे 10.30 वाजता कुटुंबाला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, दाखल करण्यापूर्वीच अब्दुल्लाची पत्नी झैनब मृत घोषित करण्यात आली, तर नसरीन आणि आयेशा यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. त्याच रात्री उपचारादरम्यान अब्दुल्लाचा देखील मृत्यू झाला.
शवविच्छेदनादरम्यान, कुटुंबातील चार सदस्यांच्या मृतदेहांमध्ये वेदनाशामकासारखा पदार्थ आढळून आल्याचे वृत्त आहे, मात्र रुग्णालय प्रशासनाने या निष्कर्षाला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
एका स्वतंत्र तपासात, एफडीएने (FDA) प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी कुटुंबाच्या निवासस्थानातून 11 नमुने गोळा केले, ज्यात बिर्याणी, टरबूज, मातीच्या भांड्यातील आणि रेफ्रिजरेटरमधील पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, कच्चे आणि शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे.
हेही वाचा
