Advertisement

मुख्यमंत्र्यांना 'टमरेल' द्यायला गेल्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात

जागतिक शौचालय दिनानिमित्त रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी 'राईट टू पी'च्या कार्यकर्त्या वर्षा बंगल्यावर जाऊन धडकल्या. मात्र माेठ्या संख्येने जमलेल्या महिला कार्यकर्त्यांना पाहून पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेऊन मलाबार हिल पोलीस ठाण्यात नेलं.

मुख्यमंत्र्यांना 'टमरेल' द्यायला गेल्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
SHARES

'जाना था जापान, पहुंच गये चीन' ही हिंदी म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, मात्र या म्हणीचा प्रत्यय रविवारी 'राईट टू पी'च्या कार्यकर्त्यांना आला. त्याचं झालं असं की जागतिक शौचालय दिनानिमित्त रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'टमरेल' देऊन शुभेच्छा देण्यासाठी 'राईट टू पी'च्या कार्यकर्त्या वर्षा बंगल्यावर जाऊन धडकल्या. मात्र माेठ्या संख्येने जमलेल्या महिला कार्यकर्त्यांना पाहून पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेऊन मलाबार हिल पोलीस ठाण्यात नेलं.



जमावबंदीचा गुन्हा?

आमचं काहीही म्हणणं ऐकूण न घेता पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं. शिवाय महिला कार्यकर्त्यांवर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती 'राईट टू पी' च्या समन्वयक सुप्रिया जान-सोनार यांनी दिली.



काय आहे प्रकरण?

चेंबूर परिसरात काही ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. तर, काही ठिकाणी रहिवाशांना सार्वजनिक शौचालयाची सुविधाच उपलब्ध नाही. अशा मागण्यांचं निवेदन घेऊन तसेच मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जागतिक शौचालय दिनानिमित्त चेंबूर परिसरातील काही महिला आणि 'राईट टू पी' च्या कार्यकर्त्या वर्षावर गेल्या होत्या. पण या कार्यकर्त्यांपैकी पोलिसांनी १० जणींना ताब्यात घेतलं.



'टमरेल' भेट देणारच!


आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेलो होतो. चेंबूर परिसरातील शौचालयाच्या समस्यांचं निवेदन घेऊन आम्ही गेलो होतो. आम्हाला मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देऊन त्यांना समस्यांचं निवेदन द्यायचं होतं. पण पोलिसांनी आम्हाला अडवलं. आम्ही मुख्यमंत्र्यांना 'टमरेल' गिफ्ट दिल्याशिवाय जाणार नाही असं म्हटल्यावर पोलीस आमच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत आहेत.

- सुप्रिया जान-सोनार, समन्वयक, राईट टू पी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा