मालाडमध्ये विहीर बुजतेय..

 Malad West
मालाडमध्ये विहीर बुजतेय..

चिंचोली बंदर - मालाड पश्चिमेकडील रामबाग परिसरात असलेली दालमिल ही सार्वजनिक विहीर बुजवण्यात येते आहे. ही विहीर 50 - 60 वर्षं जुनी आहे. पूर्वी या विहिरीचा वापर स्थानिक रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठीही करत होते. मात्र ही विहीर बुजवून त्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन दिवसांपूर्वीच विहिरीचा कठडा तोडून तो विहिरीत टाकण्यात आला आणि ही विहीर पूर्णतः बुजवली गेली. या जागेवर बांधकाम करण्यात येणार आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद घोलप यांनी पी उत्तर पालिका कार्यालयात संबंधित विभागाशी संपर्क साधून या प्रकरणी चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर या जागेची पाहणी करून कारवाई केली जाईल,  अशी माहिती पी उत्तर पालिका विभागानं दिलीय.

Loading Comments