Advertisement

ठाण्याच्या साकेत झोपडपट्टी परिसरात आग


ठाण्याच्या साकेत झोपडपट्टी परिसरात आग
SHARES

ठाण्यात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास, ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नगरविकास कार्यालयातील एका भागात शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागल्याची घटनाताजी असतानाच, बुधवारी रात्री ठाण्यातील  साकेत झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली.  आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

ठाण्याच्या साकेत झोपडपट्टी परिसराजवळी साकेत शाँपिंग सेंटरला  ही आग लागल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहीती मिळाल्यानंतर राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर  घटनास्थळी १ अग्निशमन इंजिन, एक बचाव वाहन आणि एक पाण्याचा टँकर दाखल झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नसल्याचे सांगितले जात आहे.  आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेले आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा