Advertisement

मास्टर शेफ संजीव कपूर यांची पूरग्रस्तांना दररोज पुरवताहेत १५ हजार थाळ्यांची मदत

यंदा मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून, या पावसामुळं राज्यातील अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली.

मास्टर शेफ संजीव कपूर यांची पूरग्रस्तांना दररोज पुरवताहेत १५ हजार थाळ्यांची मदत
SHARES

यंदा मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून, या पावसामुळं राज्यातील अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळं अनकांचं घरसामान पुराच्या पाण्यात वाहून गेलं. त्यामुशं या पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच आता मास्टरशेफ संजीव कंपूर यांनीही यात पुढाकार घेतला असून शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून ते चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवठा करत आहेत. त्यांची टीम पूरग्रस्तांना दररोज एकूण १५,००० थाळी ताजे जेवण पुरवत आहे.

'महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसानं पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळं अनेकांचे जीव गेले तर अनेकांनी घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. माणुसकीच्या दिशेनं टाकलेलं एक लहानसे पाऊलदेखील अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबीयांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचं शेफ संजीव कपूर यांनी स्पष्ट केलं.

कोविड १९ च्या संकट काळातही संजीव कपूर यांनी अशीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने करोना विषाणूविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. आतापर्यंत त्यांच्या टीमने दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, लखनऊ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी १० लाखाहून अधिक थाळी जेवण पुरवलं आहे.हेही वाचा -

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा