Advertisement

वर्ष अखेरीस 'माथेरानची राणी' पून्हा रुळावर

मुसळधार पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान केले होते. पावसाचा फटका रेल्वेसह माथेरानच्या मिनीट्रेनला ही बसला होता.

वर्ष अखेरीस 'माथेरानची राणी' पून्हा रुळावर
SHARES

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका माथेरानच्या मिनीट्रेनला ही झाला होता. नादुरस्त रेल्वेरूळापासून बंद असलेली माथेरानची रानी अखेर पाच महिन्यानंतर पून्हा रूळावर आली आहे. नुकतीच या मिनीट्रेनची एक यशस्वी चाचणी पार पडली असून येत्या दोन दिवसात माथेरानची राणी रुळावर येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

मुंबईसह महाराष्ट्रात या वर्षी पडलेल्या मुसळधार पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान केले होते. पावसाचा फटका रेल्वेसह माथेरानच्या मिनीट्रेनला ही बसला होता. नेरळ ते माथेरान दरम्यानचा रेल्वे रूळ २२ ठिकाणी नादुरुस्त झालेला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने मिनी ट्रेनची सेवा बंद केली होती. माथेरान स्थानक परिसरात मिनी ट्रेनच्या देखभालीसाठी पीट लाईन उभारण्यात आली आहे. या पीट मार्गिकेमुळे माथेरानमध्येच मिनी ट्रेनची देखभाल दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी अमन लॉज ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेनच्या फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. त्यासाठीच मिनी ट्रेनची चाचणी बुधवारी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीनंतर पाच महिन्यांनी मिनीट्रेन आता पून्हा रूळावर आली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावण आहे.

हेही वाचाः- बेकायदा पार्किंगचा दंड झाला कमी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा