Advertisement

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक


रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
SHARES

मुंबई - उद्या सुट्टीनिमित्ताने बाहेर फिरायला जाणाऱ्यांनो थांबा ! कारण रेल्वे मार्गावरील दुरूस्तीसाठी तिन्ही मार्गावर शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळपासून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मेगाब्लॉक असल्याकारणाने प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत.

पश्चिम रेल्वे - प.रे.वरील भाईंदर ते बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन मार्गवर सकाळी 11.00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत दुरूस्तीचे आणि तांत्रिक काम धीम्या मार्गावर चालू राहिल. ब्लॉकदरम्यान भाईंदर ते वसईरोड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरी गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसंच काही अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर रेल्वे - हार्बर लाईनवर चुनाभट्टी ते माहिम दरम्यान अप, डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे चुनाभट्टी ते माहिम दरम्यान अप डाऊनवरील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे हार्बरचे प्रवासी सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेन लाईनवरून प्रवास करू शकतात.

 

मध्य रेल्वे - मुलुंड ते माटुंगा आणि माहिम दरम्यान अप मार्गावर 11.30 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तसंच भायखळा येथील पुलाच्या तांत्रिक कामासाठी मेनलाईनच्या सँडहर्स्ट रोड आणि करीरोड स्थानकांदरम्यान चारही मार्गावर शनिवारी रात्री 11.40 ते पहाटे 5.50 या दरम्यान विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते परळ दरम्यान डाऊन दिशेने सुटणाऱ्या स्लो लोकल सकाळी 11.30 ते पहाटे 5.46 पर्यंत डाऊन जलद मार्गाने चालवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रात्री 11.26 ते पहाटे 5.46 दरम्यान परळ ते सीएसटी अप स्लो मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे यावेळेत कुर्ला, ठाणे या गाड्या रद्द होतील, तर सीएसटीहून पहाटे 5 वाजता सुटणारी कसारा डाऊन लोकल दादरपर्यंत चालवण्यात येईल.  मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करीरोड दरम्यान लोकल सेवा बंद असेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा