Advertisement

मेट्रो आणि मोनो वाहतूक विस्कळीत

मोनो रेल्वे मार्गावरील वाहतूकही एक तासाहून अधिक काळापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोई झाली असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मेट्रो आणि मोनो वाहतूक विस्कळीत
SHARES

मुंबईत (mumbai) सोमवार 7 जुलै रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचं समोर आलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर (ghatkopar) ते वर्सोवा या मार्गावरील मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली आहे.

तर दुसरीकडे, मोनो रेल्वे मार्गावरील वाहतूकही एक तासाहून अधिक काळापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोई झाली असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही मेट्रो गाड्या उशिराने धावत आहे. सकाळच्या वेळी मेट्रो वाहतूक विस्कळीत झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. मेट्रो गाड्या उशिराने धावत असल्याने घटकोपर स्थानकावर मोठी गर्दी झाली.

मेट्रोने (metro) प्रवास करण्यासाठी प्रवाशांची भलीमोठी रांग लागली होती. पावसामुळे आधीच प्रवासात अडचणी निर्माण होत असतानाच मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दुसरीकडे, संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर (chembur) यादरम्यानची मोनो रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक नेमकी कशामुळे ठप्प झाली, याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

"तांत्रिक अडचणींमुळे मोनो मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून दोन गाड्यांमधील अंतर वाढले आहे. तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी आमची टीम प्रयत्नशील असून प्रवाशांनी सहकार्य करावे," असं आवाहन मोनो प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रो आणि मोनो वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचा ऑफिसमध्ये लेट मार्क लागणार असून यामुळे प्रवाशांकडून या सेवांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.



हेही वाचा

बेस्टच्या खाजगीकरण आणि भाडेवाढीविरोधात मुंबईत जाहीर निदर्शने

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी: उद्धव ठाकरे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा