Advertisement

शीव कोळीवाड्यातल्या अतिक्रमणांवर एमएमआरडीएचा हातोडा


शीव कोळीवाड्यातल्या अतिक्रमणांवर एमएमआरडीएचा हातोडा
SHARES

एमएमआरडीए प्रशासनाने शीव कोळीवाड्यातील न्यू म्हाडा वसाहतीत झालेल्या अतिक्रमणांवर बुधवारी तोडक कारवाई केली. कारवाईच्या एक दिवस आधी एमएमआरडीए प्रशासनाने नोटीस बजावून यासंदर्भात पूर्वसूचना आस्थापनेच्या मालकांना दिली होती. मात्र काही अज्ञात व्यक्तींनी एमएमआरडीएच्या कारवाईची नोटीस काढून आपले शेड वाचवण्यासाठी दुसऱ्या अधिकृत कार्यालयावर चिकटवल्याचे पाहताच कारवाई करण्यासाठी आलेले म्हाडा अधिकारी हैराण झाले.यावेळी नेमकी आस्थापने ओळखून एमएमआरडीए प्रशासनाने रस्त्याच्या पदपथावर थाटलेले बेवारस 6 फूट बाय 30 फुटाचे अनधिकृत लोखंडी अँगल आणि पत्र्याचे मोठे शेड भुईसपाट केले. कारवाईचा बडगा उगारताच विभागातील अनेक फेरीवाल्यांची एकच धावपळ सुरू झाली. मिळालेल्या संधीचा लाभ उठवत अनेक फेरीवाल्यांनी आपल्या टपऱ्या सुरक्षित स्थळी हलवल्या. तसेच गॅरेज मालकांनी आपले शेड उतरवून गॅरेजमधील वाहने इतरत्र हलवली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडाळा टीटी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा