Advertisement

सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय

उद्यानात येणाऱ्या पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय
SHARES

मुंबई (mumbai) महापालिकेच्या (bmc) उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी आता मोबाईल चार्जिंग, वायफायची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

विजेचा वापर न करता आता मोबाईल चार्जिंग करणे, वायफाय कनेक्ट (Wifi)  करणे शक्य होणार आहे.

पालिकेच्या उद्यानात सोलार बाक बसवण्यात येत असून प्रायोगिक तत्त्वावर फोर्ट गार्डन आणि वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये बसवण्यात आले आहे.

उद्यानात येणाऱ्या पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

मोबाईल हा प्रत्येकाचा अविभाज्य भाग झाला आहे. कुठेही गेले तर हातात मोबाईल पाहिजेच. मोबाईल असला तरी अनेकदा चार्जिंगची सुविधा उपलब्ध होत नाही.

विजेची वाढती मागणी, मोबाईल चार्जिंगची (mobile charging) गरज लक्षात घेता उद्यानात सोलार बेंच उपलब्ध करण्यात येत आहेत.

सूर्यप्रकाशात दिवसभर चार्ज झाल्यानंतर उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना सहज मोबाईल चार्ज करणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे हा सोलार बाक (solar bench) स्टेनलेस स्टीलचा बनलेला असून पुढील 30 वर्षे टिकू शकतो.

गंज न पडणाऱ्या स्टेनलेस स्टीलचा बाकासाठी वापर करण्यात आला असून तो सरासरी 30 वर्षे टिकू शकेल, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे, असे डिझायनर मयांक पुणेकर यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात. फुलझाडांचे प्रदर्शन हे कुठे व कधी याची माहिती मुंबईकरांना मिळावी, यासाठी डिस्प्ले बोर्ड तयार करण्यात येत आहे.

या डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून उद्यानाशी निगडित माहिती मुंबईकरांना मिळेल, असेही ते म्हणाले.

उद्यानात मोफत वाचनालय उपक्रम सुरू केल्यानंतर आता मोबाईल चार्जिंग, वायफाय या सुविधा असलेले सोलार बेंच उद्यानात बसवण्यात येणार आहे.

सध्या फोर्ट गार्डन आणि वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये सोलार बेंच बसवले आहेत. सोलार बेंचची संकल्पना आवडली असून सगळीकडे अशा बेंचची सुविधा उपलब्ध करा, अशी मागणी होऊ लागली आहे.



हेही वाचा

विरार–अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरसाठी 765 ते 1,000 टोल प्रस्तावित

वसई-विरार पोलीसांकडून जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा