Advertisement

दोन दिवसांत खड्डे बुजणार?


दोन दिवसांत खड्डे बुजणार?
SHARES

मुंबई - खड्डेप्रकरणी अखेर मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी लक्ष घातले आहे. शनिवारी पार पडलेल्या परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीत आयुक्तांनी सोमवारपर्यंत खड्डे भरण्याचे आदेश सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत. खड्डे भरण्यास कंत्राटदारांकडून टाळाटाळ होत असेल तर कंत्राटदारांविरोधात कडक कारवाई करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. त्यानुसार खड्डे न भरणाऱ्या कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाईही होण्याची शक्यता आहे. पालिका आयुक्तांनी खड्डे त्वरीत भरण्याचे आदेश दिल्याने खड्डे भरले जातील अशी आशा आता निर्माण झाली आहे. मात्र रस्त्यारस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दोन दिवसांत सर्व खड्डे भरले जातील का? याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा