Advertisement

मान्सून केरळात ५ जूनला होणार दाखल


मान्सून केरळात ५ जूनला होणार दाखल
SHARES

मुंबईत दरवर्षी जुनच्या पंधरवड्यात पाऊस दाखल होतो. केरळात पाऊस दाखल झाला की पुढच्या काही दिवसात पाऊस मुंबईत दाखल होतो. मात्र, केरळमध्ये दरवर्षी १ जून रोजी दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र विलंबाने म्हणजे ५ जून रोजी दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा मान्सूनचा पाऊस केरळमध्ये ५ जून रोजीच्या आसपास म्हणजे विलंबाने दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत, गुरुवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 

सुधारित वेळापत्रकानुसार मान्सूनचा महाराष्ट्रासह देशातील मुक्कामदेखील वाढणार आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा केरळात पाऊस विलंबनानं दाखल होणार असल्यानं आणखी काहीसा विलंब होणार आहे.

मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख १० जून होती. आता ती ११ जून आहे. मुंबईतून ८ आॅक्टोबर रोजी मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल. परतीच्या पावसाची यापूवीर्ची तारीख २९ सप्टेंबर होती. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा