Advertisement

जानेवारीत आढळले सर्वाधिक कोरोनारुग्ण

राज्यात जानेवारीच्या १२ दिवसात मागील ५ महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णांचे निदान झाले आहे.

जानेवारीत आढळले सर्वाधिक कोरोनारुग्ण
SHARES

राज्यात जानेवारीच्या १२ दिवसात मागील ५ महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात २९ डिसेंबर ते ४ जानेवारी या काळात ६९,००८ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच संख्येत २७३.६ टक्क्यांनी वाढ होऊन ५ ते ११ जानेवारीदरम्यान नवीन रुग्णांची संख्या २ लाख ५७ हजार ४४४वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या काळात मृत्यू दर नियंत्रणात होता.

राज्यातील ४ जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या तुलनेत अधिक आहे. या जिल्ह्यात ठाणे २९.५८ टक्के, मुंबई २८.२३ टक्के, पालघर २४.९३ टक्के व रायगड २३.३४ टक्के असे साप्ताहिक पॅझिटिव्हिटी दराचे प्रमाण आहे.

२९ डिसेंबर ते ४ जानेवारीच्या दरम्यान राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. हे प्रमाण ६४,८६० इतके आहे. तर त्यानंतरच्या ५ ते ११ जानेवारीच्या काळात ही रुग्णसंख्या २,३०,८२२वर पोहोचली. या काळात नवीन कोरोना रुग्णांच्या प्रमाणात २५५.८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा