Advertisement

एमटीएनएलच्या चेंबरवरचा स्लॅब कोसळला


एमटीएनएलच्या चेंबरवरचा स्लॅब कोसळला
SHARES

शिवाजी तलाव - भांडुप पश्चिमेकडील शिवाजी तलाव चाैकावर रस्त्याखाली बांधण्यात आलेल्या एमटीएनएलच्या चेंबरवरचा स्लॅब सोमवारी दुपारी कोसळला. दुपारच्यावेळी वाहनांची वर्दळ नसल्यानं सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. मात्र या खड्ड्यांमुळे भांडुप कोकणनगर, गाढवनाका मार्गावर येणाऱ्या वाहतूकीस अडथळा निर्माण झालाय. घटनेची माहीती मिळताच स्थानिक राजकीय कार्यकर्त्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चेंबरची पाहाणी केली. या मार्गावरून भांडुप स्थानकातून येणाऱ्या कांजुरमार्ग, कोकणनगर, नरदास नगर, टेंभीपाडा बेस्ट बस आणि अवजड वाहनांंसह छोट्या गाड्यांची वर्दळ सुरू असते. चेंबर कोसळलेल्या ठिकाणी चढाव असल्यानं वाहतूकीस खोळंबा होत असून हे चेंबर लवकरात दुरूस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केलीय. 'तर, येत्या दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.'

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय