कचरा पेटी हलवल्यानं रहिवासी संतप्त

 Goregaon
कचरा पेटी हलवल्यानं रहिवासी संतप्त
कचरा पेटी हलवल्यानं रहिवासी संतप्त
कचरा पेटी हलवल्यानं रहिवासी संतप्त
See all

गोरेगाव - डोंगरी, यशवंत नगर, माॅर्निंग स्टार इमारतीसमोर असलेली कचरा पेटी महापालिकेने अचानक हलवल्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी थेट आंदोलनाचाच पवित्रा घेतला. गर्दी वाढल्यामुळे शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या परिसरात ही एकच कचरा पेटी आहे. त्यामुळे चार बिल्डिंगमधील कचरा याच कचरा पेटीत टाकला जात होता. तीच हलवल्यामुळे स्थानिक संतप्त झाले होते. याबद्दल नगरसेविका लोचना चव्हाण यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक विभागात स्वच्छता अभियान राबवत आहोत. त्यामुळे रस्त्यावरची ही कचरा पेटी उचलण्यात आली. पण या सोसायटीतल्य रहिवाशांना कचरा फेकण्यासाठी कचऱ्याचे डबेही पुरवण्यात आले होते.

Loading Comments