लोकल आणि बेस्ट बस मुंबई (mumbai) शहराची जीवनवाहीनी म्हणून ओळखली जाते. या वाहतुकीच्या पर्यायांमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांचा प्रवास महागाईच्या काळात कमी खर्चात होतो. मात्र बेस्ट बसची भाडेवाढ करून तिकिटभाडे दुप्पट करण्यात आले आहे.
या भाडेवाढीचा भार मुंबईतल्या सामान्य नागरिकांवर पडणार आहे. यामुळे मुंबईच्या डब्बेवाल्यांनी (dabbawala) या तिकिट दरवाढीला विरोध (oppose) केला आहे. गेल्या काही वर्षांपासून बेस्ट बसच्या ढिसाळ कारभाराचा मुंबईच्या सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आर्थिक बेशिस्त तसेच नव्या योजनांचा अभाव आदी विविध कारणांमुळे बेस्टची (best) आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्टची भाडेवाढ (price increase) करणे अत्यंत चुकीचे आहे. भाडेवाढ न करता देखील बेस्टची आर्थिक स्थिती सुधारता येऊ शकते, असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनने व्यक्त केले आहे.
बेस्टच्या अनेक जागा पडून आहेत. त्याचा व्यापारी उपयोग नाही. बेस्टचे आगारही मोक्याच्या जागी आहेत. कुलाबा ते दहीसर आणि मुलुंडपर्यंत या जागा आहेत. या जागेचे योग्य नियोजन केले तर उत्पन्नाचा स्त्रोत तयार होईल.
आर्थिक शिस्त, आवश्यक मार्ग चालू ठेवणे आणि बंद केलेले गरजेचे मार्ग पुन्हा सुरू करणे, बेस्ट बस (best bus) ताफ्यामध्ये बसची वाढ करणे गरजेचे आहे, असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा