Advertisement

विनामास्क कारवाईवेळी बीएमसी मार्शलला कार चालकानं बोनेटवरुन फरफटत नेलं


विनामास्क कारवाईवेळी बीएमसी मार्शलला कार चालकानं बोनेटवरुन फरफटत नेलं
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईवेळी पालिका मार्शल व नागरिक यांच्यात अनेकदा वाद होतात. नुकताच एक वाद मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात घडल्याची माहिती समोर येत आहे. बीएमसी मार्शलला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या कार प्रवाशांवर कारवाई करत असताना ही घटना घडली. बोनेटवर चढून अडवणाऱ्या बीएमसी मार्शलला मुजोर कार चालकाने गाडीवर फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे. कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत असताना मार्शल कारच्या बोनेटवर आला होता.

मुंबईतील सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विनामास्क वावरणाऱ्या कार प्रवाशांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरु असताना ही घटना घडली. संबंधित कार चालकाची बीएमसी मार्शलने अडवणूक केली. मात्र कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत होता.

मार्शल कारच्या बोनेटवर अर्धवट चढला. त्यानंतरही कार चालकाने गाडी न थांबवता त्याला गाडीसोबत तसेच पुढे फरफटत नेले. सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. आरोपी कार चालक किंवा बीएमसी मार्शलविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा