Advertisement

मुंबईत पुढील २-३ दिवस आणखी कडाक्याच्या थंडीची शक्यता

मुंबईत या मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी तापमान १४ अशांवर पोहोचलं आहे.

मुंबईत पुढील २-३ दिवस आणखी कडाक्याच्या थंडीची शक्यता
SHARES

मुंबईत या मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी तापमान १४ अशांवर पोहोचलं आहे. सोमवारी मुंबईत १६ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. शिवाय, मुंबई आलेली कडाक्याची थंडी पुढील २दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत लोक या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे.

नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार आणि निफाडमध्ये तापमान ५ अंशांपर्यंत घसरले आहे. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबई आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा