Advertisement

मुंबई- खारकोपर ते नेरुळ आणि बेलापूर लोकल ट्रेन सेवा विस्कळीत

मंगळवारी सकाळी ८.४६ वाजता बेलापूर ते खारकोपर मार्गावर रेल्वेचा डब्बा घसरल्याने अपघात झाला.

मुंबई- खारकोपर ते नेरुळ आणि बेलापूर लोकल ट्रेन सेवा विस्कळीत
SHARES

मंगळवारी सकाळी ८.४६ वाजता बेलापूर ते खारकोपर मार्गावर रेल्वेचा डब्बा घसरल्याने अपघात झाला. या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

हे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागणार असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे खारकोपर ते नेरूळ आणि बेलापूर मार्गावरील लोकल सेवा संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी बेलापूर ते उलवे नोडच्या बामन डोंगरी स्थानकात धावणारी लोकल खारकोपर स्थानकात येत असताना इंजिनसह दोन डबे रुळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील गाडी पूर्ववत होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागणार आहे.



हेही वाचा

1 मार्चपासून बेस्टच्या 'स्मार्ट' कार्ड धारकांना बसमध्ये प्रथम प्रवेश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा