Advertisement

वरळीत लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू

19 मजल्याची ही इमारत असून पोलिस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वरळीत लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू
SHARES

वरळीत लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू झालाय. वरळीतील अविघ्न हाऊस मायानगर येशील इमारतीत ही घटना घडलीय. 19 मजल्याची ही इमारत असून पोलिस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 19 मजली या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. परंतु, लिफ्ट बसवण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी ही घटना घडली आहे.

वरळीतील अविघ्न टॉवरमध्ये दोन व्यक्ती लिफ्ट ट्रॉलीच्या सहाय्याने काच पुसण्याचं काम करत असताना लिफ्ट कोसळली. यावेळी या लिफ्ट ट्रॉलीवर काम करत असलेले दोघे जण सोळाव्या मजल्यावरून लिफ्टसह खाली कोसळले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारदर सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

लिफ्ट कोसळून कामगारांचा मृत्यू होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या पूर्वी 4 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील विक्रोळी येथील सिद्धिविनायक सोसायटीची पार्किंग लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता.

शिवम जैस्वाल असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव होतं. लिफ्टचा ढाच्या कोसळल्यानंतर जैस्वाल यांना दीड तासांनंतर त्यातून बाहेर काढण्यात आले होते. परंतु, जैस्वाल हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


हेही वाचा

माहीम चर्च स्मशानभूमीत तोडफोड करणाऱ्याला अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा